अजितदादांचा घातपात झाला असेल तर बदला घ्यावा लागेल, अमोल मिटकरी यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात हा घातपात असेल तर त्याचा बदला निश्चितच घ्यावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी आज दिला. अजितदादांच्या विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करावी किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी करावी, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही मिटकरी यांनी सांगितले.

विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, निळी पॅन्ट घातलेली व्यक्ती बाहेर येतेय असे आधी वाटले, पण नंतर काहीच दिसले नाही, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जात असतानाच मोठा स्फोट झाला, अशी धक्कादायक माहिती गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी दिल्याचे मिटकरी यांनी सांगितले. या विमान अपघातात आधी 6 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली, पण घटनास्थळी पाचच मृतदेह सापडले. मग सहावी व्यक्ती कोण? असा सवालही मिटकरी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला.