
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हयातील ९ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना ६ फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान केंद्र असणा-या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पंचायत समिती हद्दीतील शाळेतील मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी पोहोचणार आहेत. त्यामुळे ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान केंद्र असणाऱ्या पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर क्षेत्रातील शाळांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी सुट्टी जाहीर केली आहे.






























































