
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सहदेव बेटकर यांनी आघाडी घेतली आहे.जिल्हा परिषदेवर दोन्ही पंचायत समिती गणात विजय मिळवून भगवा फडकवू असा विश्वास उमेदवार सहदेव बेटकर यांनी व्यक्त केला आहे.
2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचे वर्चस्व मोडून काढत सहदेव बेटकर विजयी झाले होते.त्यांनी शिक्षण सभापतीपदही यशस्वीरित्या सांभाळले होते.सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. धामापूर जिल्हा परिषद गटात मशाल पेटवण्याचा निर्धार सहदेव बेटकर यांनी केला आहे.संपूर्ण मतदारसंघात घरोघरी जाऊन ते प्रचार करत आहेत.उमेदवार सहदेव बेटकर यांनी सांगितले की,2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत मी धामापूर गटातून विजयी झालो होतो.मी केलेल्या विकासकामांमुळे मला विजयाची खात्री आहे.माझ्यासोबत मी दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवारांना विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहे.































































