डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्यास जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायन राऊथ या आरोपीला फेडरल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार करत असताना 15 सप्टेंबर 2024 रोजी राऊथ याने एके-47 ने गोळीबार केला होता. न्यायालयाने रायन राऊथला सप्टेंबर 2024 मध्ये पाच आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. यामध्ये घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हादेखील समाविष्ट आहे. जन्मठेपेव्यतिरिक्त राऊथला इतर अनेक शिक्षाही सुनावण्यात आल्या आहेत. यात हिंसक गुह्यादरम्यान शस्त्र बाळगल्याबद्दल 84 महिने, एका फेडरल अधिकाऱयावर हल्ला केल्याबद्दल 240 महिने, शस्त्र बाळगल्याबद्दल 18 महिने आणि सिरीयल नंबर मिटवलेले शस्त्र बाळगल्याबद्दल 60 महिन्यांच्या शिक्षेचा समावेश आहे.