
मॉस्कोमधील एका अपार्टमेंट इमारतीत अज्ञात हल्लेखोराने रशियाचे वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी आणि उपसंरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयव्ह यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यानंतर आता रशियाच्या उपसंरक्षणमंत्र्यांवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. यासाठी रशिया युक्रेनला जबाबदार धरत आहे.
रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयव्ह यांना शुक्रवारी मॉस्कोमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर जखमी झालेल्या अलेक्सेयव्ह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ही माहिती राज्य माध्यमांनी तपास यंत्रणांच्या हवाल्याने दिली. लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयेव हे रशियन संरक्षण मंत्रालयाच्या जनरल स्टाफच्या मुख्य संचालनालयाचे उपप्रमुख आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत अनेक वरिष्ठ रशियन लष्करी अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे, ज्यासाठी रशिया युक्रेनला दोष देत आहे.
तपास समितीच्या प्रवक्त्या स्वेतलाना पेट्रेन्को म्हणाल्या की लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयेव यांच्यावर वायव्य मॉस्कोमधील एका अपार्टमेंट इमारतीत एका अज्ञात हल्लेखोराने अनेक गोळ्या झाडल्या. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अनेक वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. मॉस्कोने या हल्ल्यांसाठी कीवला जबाबदार धरले आहे. काही प्रकरणांमध्ये, युक्रेनियन लष्करी गुप्तचर संस्थेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.


























































