
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत चीनच्या फेंग्रान तियान हिने मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित ऑस्ट्रियाच्या लिली टॅग्गीर हिने लात्वियाच्या दुसऱ्या मानांकित दर्जा सेमेनिस्तजाचा ४-६, ६-४, ६-२ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. १७ वर्षीय लिलीने २०२४ मधील विजेती दर्जाचे आव्हान २तास १७मिनिटात मोडीत काढले.
थायलंडच्या पाचव्या मानांकित लानलाना तारारुडी हिने फ्रान्सच्या तिसऱ्या मानांकित लिओलिया जीनजीनचा ४-६, ६-३, ६-२ असा कडवा प्रतिकार करत अनपेक्षित निकाल नोंदवला. जागतिक क्रमवारीत १२९ व्या स्थानी असलेल्या लानलाना हिने २तास १७ मिनिटात लिओलिया वर विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन्ही सेटमध्ये लानलाना हिने वरचढ खेळाचे प्रदर्शन केले.
गतविजेत्या थायलंडच्या मननचया सवांगींकवे हिने रशियाच्या तातियाना प्रोझोरोव्हाचा ६-१, ६-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या लिओलिया जीनजीन व स्वित्झर्लंडच्या नेमा कारामोको या जोडीने हिंदुस्थानच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व अंकिता रैना यांचा ६-४, ६-२ असा पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी:
लानलाना तारारुडी(५)(थायलंड) वि.वि.लिओलिया जीनजीन(३)(फ्रान्स)४-६, ६-३, ६-२;
मननचया सवांगींकवे(थायलंड)वि.वि.तातियाना प्रोझोरोव्हा(रशिया) ६-१, ६-४;
लिली टॅग्गीर(७)(ऑस्ट्रिया)वि.वि.दर्जा सेमेनिस्तजा(२)(लात्विया) ४-६, ६-४, ६-२;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
लिओलिया जीनजीन(फ्रान्स)/नेमा कारामोको(स्वित्झर्लंड) वि.वि.श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती/अंकिता रैना(हिंदुस्थान)६-४, ६-२.





























































