Under 19 World Cup – टीम इंडियाचा षटकार! सहाव्यांदा पटकावला विश्वचषक; इंग्लंडचा दणदणीत पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने इंग्लंडचा दारूण पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक पटकावला आहे.  वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी व आरएस अंबरिशचा भेदक मारा याच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला नमवत अंडर 19 च्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावा राखून पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने इंग्लंडसमोर धावांचा डोंगर रचला होता. वैभव सूर्यवंशीच्या 175 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 411 धावा केल्या होत्या. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने सर्वबाद 311 धावा केल्या.