चीनची गुपचूप अण्वस्त्र चाचणी, अमेरिकेचा तिळपापड, अण्वस्त्रांच्या संख्येवर कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अण्वस्रांची संख्या कमी करण्याबाबत नवा करार करण्याची तत्काळ गरज असल्यावर अमेरिका आणि रशियाने संमती दिली असतानाच चीनने गुप्तपणे अण्वस्त्र चाचणी केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्याचवेळी चीनने अण्वस्त्रांची संख्या वाढवल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेकडून चीनवर भविष्यातील अण्वस्त्र करारामध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने दबाव वाढत आहे. मात्र, त्याचवेळी चीनने अण्वस्त्र चाचणी केल्यामुळे अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अण्वस्त्र नियंत्रणाबाबत होत असलेल्या करारांमध्ये चीन नसल्यास अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची सुरक्षा धोक्यात येते, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माकाx रुबियो यांनी म्हटले आहे. जिनेव्हा येथे अण्वस्त्रमुक्तीबाबत आयोजित परिषदेत अमेरिकेचे अधिकारी थॉमस डिनॅन्नो म्हणाले, की चीनने अण्वस्त्र चाचणी केली आणि ती लपवण्याचा प्रयत्न केला. चीनच्या अण्वस्त्रांची संख्या वर्ष 2020पासून 200 वरुन 600 वर गेल्याचा दावा माकाx रुबियो यांनी केला आहे. दरम्यान, अण्वस्त्र चाचणीबाबत अमेरिकेने केलेला दावा चीनने फेटाळला आहे.