
>> नीलिमा प्रधान
मेष – वर्चस्व सिद्ध कराल
मेषेच्या एकादशात सूर्य, चंद्र, बुध लाभयोग. कोणताही किचकट प्रश्न सोडवू शकाल. तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. नोकरीधंद्यात वसुली होईल. नवे काम मिळेल. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धेत यश मिळेल.
शुभ दि. 8, 9
वृषभ – जिद्दीने यश मिळवाल
वृषभेच्या दशमेषात सूर्य, चंद्र, मंगळ लाभयोग. मानसिक संतुलन बिघडेल. त्यामुळे अस्थिर व्हाल. संयम ठेवा. जिद्दीने यश मिळवता येईल. कुठेही आग्रही भूमिका नको. नोकरीत मेहनत घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा.
शुभ दि. 10, 11
मिथुन – नवीन परिचय उत्साहवर्धक
मिथुनेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, बुध लाभयोग. विरोध युक्तीने, प्रेमाने दूर करा. यशाचे नवे पर्व गाठाल. नोकरीत बुद्धिचे कौतुक होईल. नवा परिचय उत्साहवर्धक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य मिळवाल. प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दि. 8, 9
कर्क – फसगत टाळा
कर्केच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र, मंगळ लाभयोग. कोणत्याही क्षेत्रातील पेचप्रसंग वाढेल. अचानक कामात बदल करावा लागेल. फसगत टाळा. नोकरी टिकवा. महत्त्वाच्या वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आग्रही भूमिका नको.
शुभ दि. 10, 11
सिंह – अहंकार दूर ठेवा
सिंहेच्या सप्तमेशात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. सप्ताहाच्या शेवटी दिलासा देणारी बातमी मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत दगदग होईल. खरेदी, विक्रीत फायदा. अहंकार दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुंता वाढेल.
शुभ दि. 13, 14
कन्या – वाद वाढवू नका
कन्येच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र, मंगळ लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो अट्टहास दूर ठेवा. कोणावरही टीका करू नका. वाद वाढेल असे भाष्य नको. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी वाद नको. संयम ठेवा. आक्रमक मुद्दे नको.
शुभ दि. 8, 9
तूळ – रागावर नियंत्रण ठेवा
तुळेच्या पंचमेषात सूर्य, चंद्र बुध लाभयोग. आत्मविश्वास वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. पद्धतशीरपणे कामे पूर्ण करता येतील. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. टीकेकडे दुर्लक्ष करा.
शुभ दि. 10, 11
वृश्चिक – महत्त्वाचा निर्णय घ्याल
वृश्चिकेच्या सुखेशात सूर्य, चंद्र, मंगळ लाभयोग. प्रमाणाबाहेर आत्मविश्वास ठेवल्यास अडचणीत वाढ होईल. आळस नुकसान करेल. नोकरीत दगदग होईल. धंद्यात नवे धोरण नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्याल.
शुभ दि. 13, 14
धनु – योजनांचा आढावा घ्या
धनुच्या पराक्रमात सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर तणाव, चिंता जाणवेल. नोकरीत महत्त्वाची कामे कराल. नवा परिचय उत्साहवर्धक. कुणाच्याही आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांचा आढावा घ्याल.
शुभ दि. 13, 14
मकर – लोकप्रियता वाढेल
मकरेच्या धनेषात सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. गुप्त कारवायांवर करडी नजर ठेवा म्हणजे धोका टाळता येईल. नोकरीधंद्यात टिकून रहा. कर्जाच्या कामात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. लोकप्रियता वाढेल. वसुली करा.
शुभ दि. 8, 9
कुंभ – रागावर ताबा ठेवा
स्वराशीत सूर्य, चंद्र गुरू त्रिकोण योग. उत्साहाच्या भरात एखादे मोठे धाडस कराल पण प्रकृतीची काळजी घ्या. सुधारणा होईल. रागावर ताबा ठेवा. कोणतेही कठीण काम करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दि. 13, 14
मीन – अनाठायी खर्च टाळा
मीनेच्या व्ययेशात सूर्य, चंद्र मंगळ लाभयोग. तुमचे काम, निर्णय याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता. व्यसन, मोह नुकसानकारक. अनाठायी खर्च टाळा. नोकरीधंद्यात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आश्वासन देऊ नका.
शुभ दि. 10, 11



























































