गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल; आसामचे मुख्यमंत्री सरमा वादात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे अल्पसंख्याक नागरिकांवर गोळीबार करत असल्याचा प्रतिकात्मक व्हिडिओ आसाम भाजपने ‘एक्स’वर शेअर केल्याने वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. वादाला तोंड फुटताच हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला आहे.

आसाम भाजपने शेअर केलेल्या या व्हिडिओचे शीर्षक ‘पॉइंट ब्लँक शॉट’ असे होते. यात मुख्यमंत्री सरमा हे प्रतिकात्मक गोळीबार करताना दिसत आहेत. त्यांच्या निशाण्यावर मुस्लिम व्यक्ती असल्याचे व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर भाजपने हा व्हिडिओ लगेचच डिलिट केला.

काँग्रेसची कारवाईची मागणी

काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल यांनी यावरून भाजपवर हल्ला चढवला. अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याची ही खुलेआम चिथावणी आहे. एक थिल्लर पोस्ट म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून पेरलेले विष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या पृतीचा निषेध होण्याची अपेक्षा नाही. न्यायव्यवस्थेने तात्काळ याची दखल घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वेणूगोपाल यांनी केली.