
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवार, 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीची विद्यार्थी संख्या सुमारे 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी माहिती दिली.































































