
अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंग सुंदर सिंग जॉली ऊर्फ शेराने त्याच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महिलेला फोन करून धमकावल्याचा शेरावर आरोप आहे.
ही घटना 2017 मधील आहे. आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सलमानने एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले होते. याची पोलिसांत तक्रार करण्यासाठी ही महिला या स्पर्धकाला मदत करणार होती. ही तक्रार करून सलमानला त्रास देऊ नकोस, असे शेराने फोन करून धमकावल्याचा या महिलेचा आरोप आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर याचे आरोपपत्र दाखल झाले. हा गुन्हा व आरोपपत्र रद्द करावे, अशी मागणी शेराने याचिकेत केली आहे.


























































