
प्रवासादरम्यान गाडी अचानक नादुरुस्त झाल्यास घाबरून न जाता सुरक्षितता बाळगणे आणि योग्य मदतीसाठी संपर्क करणे महत्त्वाचे असते.
सर्वप्रथम गाडी सुरक्षित ठिकाणी पार्क करा. जर तुम्ही हायवेवर असाल, तर ती रस्त्याच्या मधोमध उभी न करता, रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्क करा.
गाडीचे हॅझार्ड लाईट्स सुरू करा व मागच्या बाजूस रिफ्लेक्टिव्ह वार्ंनग ट्रँगल ठेवा. यामुळे इतर वाहनांना गाडी बंद असल्याची पूर्वकल्पना येईल.
महामार्गावर असाल तर रस्त्यावर उभे राहणे टाळा. गाडीच्या आत सीटबेल्ट लावून बसा. अनोळखी व्यक्तींकडून मदत घेताना सावधगिरी बाळगा.
जर नॅशनल हायवेवर असाल तर 1033, एखाद्या असुरक्षित किंवा निर्जन ठिकाणी असाल तर 112 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर किंवा पोलिसांना संपर्क साधा.



























































