
चेहऱ्याचा रंग काळवंडण्यामागे तीव्र सूर्यप्रकाश (सनटॅन), मेलॅनिनचे असंतुलन, हार्मोनल बदल किंवा शरीरातील पोषक घटकांची कमतरता ही मुख्य कारणे असू शकतात. थायरॉईड, पीसीओडी (PCOD) किंवा गर्भधारणेमुळे हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग किंवा मेलास्मा होऊ शकतो.
घराबाहेर पडताना चांगले ‘सनस्क्रीन’ नक्की लावा. दिवसातून 2-3 वेळा थंड पाण्याने किंवा माइल्ड फेस वॉशने चेहरा धुवा. दिवसभरात पुरेसे पाणी प्या.




























































