
नांदेड सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलगनर साहिब बोर्ड पुर्नस्थापित, महाराष्ट्र शासन निर्णय राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने 15 दिवसात पूर्वीच्या आदेशाचे पालन करत बोर्ड पुर्नगठीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागातर्फे मुंबई उच्च न्यायालय (छत्रपति संभाजी नगरखंडपीठ) यांच्या निर्देशांचे पालन करुन नांदेड सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब बोर्डाला त्याच्या मुळ स्थिती मध्ये पुनः बहाल करण्यात आले. यासंबंधी राज्य सरकार तर्फे महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण भाग चार-अ) मध्ये अधिकारीक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने नांदेड सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब अधिनियम 1956 चे कलम 6 ची उप कलम (4) व (5) आणि कलम 11 ची उप कलम (1) च्या अंतर्गत दि.8 मार्च 2019ची अधिसुचनेच्या आधारे गुरुद्वारा बोर्डाचे गठन करण्यात आले होते व अध्यक्षांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली होती. साल 2022 च्या कारवाई नंतर राज्य शासनाने दि.29 जून 2022 ची अधिसूचना अधिकारा अन्वये या बोर्डाला निरस्त करण्यात आले होते. तसेच वेळो-वेळी गुरुद्वारा बोर्डाचे कामकाज व संचालन करण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत होती. त्यावेळी विजय सतबिरसिंघ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नांदेडच्या काही शिख बांधवांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तत्कालीन सचिव स.रविंद्रसिंघ बुंगई यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.
साल 2002 च्या या शासन निर्णयास आव्हान देणार्या रीट याचीकेवर सुनावणी करतांना, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी आपला निर्णय दिला. न्यायालयाने 29 जून 2022 ची सरकारी अधिसूचना रद्द केली आणि राज्य सरकारला मंडळाला त्याच्या मूळ स्थितीत पुर्नस्थापित करण्याचे निर्देश दिले. शासनाद्वारे पुर्न स्थापना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 8 मार्च 2019 रोजी गठीत झालेल्या मंडळाच्या महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे उपसचिव भगवान सावंत यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पुर्नस्थापित करण्यात आले आहे. 29 जून 2022 च्या वेळेस विद्यामान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची नांवे खालील प्रमाणे आहेत स. भूपिंदर सिंघ जी मिन्हास (अध्यक्ष), स. गुरिंदर सिंघ जी बावा (उपाध्यक्ष), स. रविंदर सिंघ जी बुंगई (सचिव), स. मनप्रीत सिंघ जी कुंजीवाले (सदस्य), स. गुरमीत सिंघ जी महाजन (सदस्य), स. हरपाल सिंघ जी भाटीया, स. गोबिंद सिंघ जी लोंगोवाल (सदस्य), स. परमज्योत सिंघ जी चाहल (सदस्य), स. रघुजीत सिंघ जी विर्क (सदस्य) यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली आहे.




























































