
दूरसंचार विभागाने मेसेजिंग अॅप्ससाठी ‘सिम-बाइंडिंग’ नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर प्रमुख मेसेजिंग अॅप्स वापरण्यासाठी मोबाइल क्रमांकाशी संबंधित ऑक्टिव सिमकार्ड डिव्हाईसमध्ये असणे आवश्यक आहे. त्याशिवाय हे अॅप्स वापरता येणार नाहीत.
वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही सायबर गुन्हेगार मोबाईल क्रमांकावर सिमकार्ड खरेदी करून मेसेजिंग अॅप्सवर खाती तयार करून परदेशातून त्यांचा गैरवापर करतात. फिशिंग, बनावट ओळखपत्र आणि ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नोंदणी केलेला क्रमांक आणि सक्रिय सिम यांच्यातील संबंध कायम ठेवणे आवश्यक आहे, असे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.
काय आहे सिम–बाइंडिंग
सिम–बाइंडिंग म्हणजे मेसेजिंग अॅपचे खाते ज्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी केलेले आहे, या क्रमांकाशी संबंधित सक्रिय सिमकार्ड आणि अॅप यांच्यात तांत्रिक संबंध कायम ठेवणे. सध्या अनेक अॅप्सवर क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर सिमकार्ड पह्नमधून काढले तरी वाय–फायच्या सहाय्याने खाते चालवता येते, मात्र नवीन नियमानुसार ही सवलत मर्यादित राहू शकते.

























































