
फिलिपाईन्समध्ये हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांची हवेतच टक्कर झाली आहे. प्रशिक्षणादरम्यान ही घटना घडली असून या भीषण अपघातात चार वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दक्षिण मनिला येथील बातांगास प्रांतातील फर्नांडो एअर बेस येथे ही दुर्घटना घडली. या अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Philippine Air Force planes FLY DANGEROUSLY CLOSE before COLLIDING MID-AIR — BOTH SPIRAL OUT OF CONTROL & CRASH during TRAINING
4 AIR FORCE PILOTS KILLED https://t.co/fgqEdxJNM3
— RT (@RT_com) October 24, 2026
फिलिपाईन्स एअर फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, बातांगास प्रांतातील फर्नांडो एअर बेसवर वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू आहे. एसएफ-260 प्रकारच्या लढाऊ विमानांद्वारे प्रशिक्षण सुरू असताना हवेतच दोन विमानांची धडक झाली. शुक्रवारी दुपारी 3 वाजून 51 मिनिटांनी ही दुर्घटना झाली. अपघातानंतर दोन्ही विमाने एअर बेसच्या हद्दीमध्ये कोसळली. यात दुर्घटनेमध्ये चार वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
READ | The Philippine Air Force (PAF) mourns the loss of four pilots in an aviation accident involving two SF-260 aircraft during a training flight at Fernando Air Base on October 23, 2026, at 3:51 PM.
Read more: https://t.co/C39gmTooLg https://t.co/g91Xn2br8Q
— Philippine Air Force (@PhilAirForce) October 24, 2026
शुक्रवारच्या दुर्घटनेनंतर फिलिपाइन्सच्या एअर फोर्सने खबरदारीचा उपाय म्हणून एसएफ-260 प्रकारच्या सर्व प्रशिक्षण विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत या विमानांचे उड्डाण बंद राहणार आहे.
दरम्यान, फिलिपाईन्सच्या हवाई दलात प्रशिक्षणादरम्यान विमान अपघात होण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मे महिन्यात उत्तर फिलिपाईन्समध्ये झालेल्या अशाच एका विमान अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. तसेच, 2023 मध्ये प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे एसएफ-260 प्रकारचे विमान कोसळून दोन वैमानिकांना प्राण गमवावे लागले होते.



























































