
कधी कधी कामावर कायम लक्ष केंद्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. लक्ष विचलित करणारे घटक काढून टाका. रोजचे वेळापत्रक तयार करा. कामाच्या वेळी खायला बाहेर जाण्याऐवजी खाद्यपदार्थ सोबतच आणा.
दररोज व्यायाम करा. दररोजच्या कामांची यादी बनवा. मधे छोटीसी विश्रांती घ्या. मोबाईल गरजेचा नसल्यास बंदच करा.
जेवणाची वेळ, दुपारी चहाची वेळ या वेळा एकदा तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवल्या की मग तुमचं रुटीन आपोआपच बसतं. मग कामावरच्या इतर महत्त्वाच्या गोष्टी डिस्टर्ब होत नाहीत.



























































