क्रेडिट कार्ड ब्लॉक झालं तर काय कराल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजकाल बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. कार्ड ब्लॉक करणे म्हणजे खाते बंद करणे नाही. मात्र तुम्हाला विलंब शुल्क, व्याज इ. तसेच काही थकबाकी असेल तर शुल्क लागू शकते.

आरबीआयच्या मते, ब्लॉक केल्याने फक्त व्यवहार थांबतात, खाते बंद होत नाही. बँकेने कार्ड बंद करण्याचे काम वार्ंकग डेजमध्येच करावे. खाते बंद झाल्याची तक्रार CICs कडे नोंदवावी.

जर वार्षिक शुल्क खूप जास्त असेल, तुमच्याकडे खूप जास्त कार्ड असतील किंवा तुम्हाला तुमचा क्रेडिट एक्सपोजर कमी करायचा असेल, तर कार्ड बंद करा.

कस्टमर केअरला कार्ड बंद करण्याची विनंती करा. बँकेतून एक ई-मेल येईल. सात दिवस वाट पाहा, निधी भरल्यानंतरच ते सुरू होईल. कार्ड कापून नष्ट करा. फक्त ते फेकून देऊ नका.

स्ट्रिप आणि चिप कापून टाका. CIBIL मध्ये खाते बंद झाले आहे का ते तपासा. कार्ड बंद आहे की फक्त ब्लॉक आहे याची माहिती बँकेने क्रेडिट ब्युरो (CIBIL, Experian, CRIF, Equifax) ला द्यावी.