तेलंगणातील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त भाईंदर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात धडक कारवाई करून एमडीचा कारखाना उदध्वस्त केला. या कारवाईत २७ लाख ६ हजार ७४० रुपये किमतीची ४४.६९९ किलो रासायनिक पावडर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटमधील मुख्य आरोपींसह आतापर्यंत एकूण २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथील ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचे धागेदोरे गुजरात आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ आता थेट तेलंगणापर्यंत जाऊन पोहचले आहेत. आरोपींच्या चौकशीत एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी वापरली जाणारी ‘२-ब्रोमो-४-मेथिलप्रोपिओफेनोन’ ही रासायनिक पावडर तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील आयडीए पाशमैलाराम येथील कारखान्यात तयार होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.