चक्कर आल्याने दुचाकी घसरली, वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चक्कर आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मोहम्मद शकील गुज्जू चौधरी (६७) यांचा मृत्यू झाला. ही घटना मीरा रोड येथील काशीगाव परिसरात घडली. या अपघातात चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना सुरुवातीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांना मुंबई येथे जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते.

मोहम्मद शकील चौधरी हे दुचाकीवरून काशीगाव, मीरा रोड येथून कांदिवलीच्या दिशेने जात होते. मीरा-भाईंदर रस्त्यावर प्रवास करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश पाटील करत आहेत.