
तिबेटमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भूकंपात 16 नागरिकांचा मृत्यू झाला असून 54 जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे 400 किलोमीटर दूर, तिबेटमधील नागकू भागात जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने सुपरमार्केटमधील सामान खाली पडले. तिबेटसोबत पाकिस्तानमध्ये 4.9 आणि अफगाणिस्तानमध्ये 4.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.
तुरुंगामध्ये 238 हिंदुस्थानी कैदी
बांगलादेशच्या तुरुंगामध्ये 238 हिंदुस्थानी कैदी बंदिस्त असून यापैकी 168 जणांची शिक्षा पूर्ण झाली आहे, मात्र तरीही ते हिंदुस्थानात परतू शकले नाहीत. कारण यापैकी अनेक पैद्यांचे नागरिकत्व सिद्ध होऊ शकले नाही. बांगलादेशातील एका अहवालानुसार देशात 15 देशांतील 407 विदेशी पैदी बंदिस्त आहेत. यामध्ये सर्वात जास्त पैद्यांची संख्या ही हिंदुस्थानी नागरिकांची आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही तुरुंगात बंद असलेल्या 25 हिंदुस्थानी कैद्यांची ओळख पटली आहे, असे अधिकाऱयाने सांगितले.
पूंछमध्ये शोधमोहिमेत शस्त्रास्त्रे आढळली
जम्मू-कश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराने केलेल्या शोधमोहिमेत सात संशयित आयईडी आणि 7.62 लाईट मशीन गनची मॅगझीन जप्त केली. लष्कराला तपकिरी टेपने गुंडाळलेले सहा पंटेनर, निळय़ा टेपने गुंडाळलेला एक कंटेनर आणि एक संशयित मॅगझीन कंटेनर आढळला. याशिवाय, एक काळी बॅग, कॉम्बॅट पाऊच, पॉवर अडॅप्टर, विजेचा स्रोत, अॅल्युमिनियम पंटेनर आणि टिफिनही सापडले. बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी काल दोन संशयितांना मदत करणाऱया दोघांना अटक केली होती.






















































