लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी; विरोधी पक्ष आज नोटीस देणार, 102 खासदारांचा पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
om-birla

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू झालेला राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. या प्रस्तावावर 102 खासदारांनी सह्या केल्या असून, मंगळवारी लोकसभा सचिवालयाला तशी नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे.