सोने चांदीच्या तेजीला पुन्हा एकदा ब्रेक; सोने 2000 तर चांदी 5500 रुपयांनी घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने चांदीच्या दरात गेल्या दोन दिसांपासून आलेल्या तेजीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. वायदे बाजाराला मंगळवारी सुरुवात होताच सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी दोन्ही घसरणीसह उघडले आणि स्वस्त झाले. चांदीच्या दर आता त्यांच्या उच्चांकापासून १.६३ लाखांपेक्षा कमी झाले आहेत. सलग मोठ्या घसरणीनंतर गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी येत होती. मात्र, मंगळवारी त्यात पुन्हा घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या किमती प्रति किलोग्रॅम ५,५०० पेक्षा जास्त घसरल्या, तर सोन्याच्या किमतीही २००० रुपयांनी घसरल्या.

२९ जानेवारी रोजी चांदीच्या किमती पहिल्यांदाच ऐतिहासिक ४ लाखांच्या पातळीवर पोहोचल्या,तेव्हा या किमतींनी ४,२०,०४८ एवढा विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. सोमवारी MCX वर चांदी २,६२,६२० रुपयांवर ​​बंद झाले आणि मंगळवारी बाजार सुरू होताच त्यात मोठी घसरण झाली. बाजार सुरू होताच चांदीच्या दरात 5500 रुपयांची घसरण होत ते २,५६,८ वर पर्यंत घसरले. आता त्याच्या उच्चांकापेक्षा १,६३,१८४ रुपयांनी घसरली आहे.

सोमवारी सोने १,५८,०६६ वर बंद झाला होता आणि मंगळवारी बाजार उघडताच १,५६,००१ वर आला. सोन्याच्या किमतीत २,०६५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीकिमतींप्रमाणेच २९ जानेवारी रोजी सोन्यानेही ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. तेव्हा सोने १,९३,०९६ रुपयांवर पोहोचले होते. या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर, सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली. सोने त्याच्या उच्चांकावरून ३७,०९५ रुपयांनी घसरले आहे.