तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का, खासदार अरविंद सावंत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सावंत म्हणाले की, “विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलू दिले जात नसेल, तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का बसतो. त्यांना बोलण्याची संधीच दिली जात नसेल, तर काय करायचे?”

ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे लोकसभा अध्यक्ष अशा प्रकरणांत निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची टीकाही त्यांनी केली.