पनवेलच्या महापौरपदी नितीन पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे नितीन पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे झाली.

पनवेल महापालिकेच्या ७८ जागांपैकी भाजप महायुतीकडे ६० नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे, तर महाविकास आघाडीकडे १८ नगरसेवक आहेत. महापौरपद ‘ओबीसी’ प्रवर्गासाठी आरक्षित होते. भाजपची एकहाती सत्ता असल्याने महापौरपदाच्या शर्यतीत अॅड. मनोज भुजबळ, अमर पाटील, नितीन पाटील, प्रवीण पाटील आणि ममता म्हात्रे या ओबीसी प्रवर्गामधून निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे होती. यामध्ये प्रवीण पाटील यांनी बाजी मारली. नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांचा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ तसेच नवनिर्वाचित उपमहापौर प्रमिला पाटील यांचा पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी नगर सचिव नानासाहेब कामठे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.