मोहिते-पाटील यांनी माझ्या हत्येचा कट रचलाय! माजी आमदार राम सातपुते यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा मतदारसंघातील खासदार मोहिते-पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे, असा खळबळजनक आरोप माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. ते आज सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते.

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे माझ्यावर मारहाण करून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. राम सातपुते कोणाला घाबरत नाही. आजवर चोख प्रतिउत्तर दिले आहे. लोकशाही मार्गाने आम्ही निवडणुका जिंकत आहोत. आमचा विजय सहन न झाल्यामुळे कटकारस्थान केले जात असल्याचेही सातपुते यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपला मिळालेल्या निवडणुकीतील मतदानामुळे राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. मला जे गुंड म्हणतात तेच सर्वांत मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये कोणत्या प्रकारचे वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.