
देश–विदेशातील ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी कंबोडियामध्ये बनावट मुंबई पोलीस स्टेशन उभारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंबोडियात आतापर्यंत 190 ऑनलाईन स्पॅम सेंटर्स सील करण्यात पोलिसांना यश आले आहे. ‘माय पॅसिनो’ नामक संपुलात अनेक खोल्यांमधून फसवणुकीच्या कारवाया सुरू होत्या. बूथ आणि एक बनावट भारतीय पोलिस स्टेशनही तयार करण्यात आले होते. ‘ग्रेटर मुंबई पोलिस’ असे लिहिलेला फलक तसेच पोलिसांचा गणवेशही तिथे होता. लोकांना व्हिडीओ काॅल करून तोतया पोलिस अधिकारी बनून धमकावण्यासाठी आणि ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे हजारो लोकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत या स्पॅम केंद्रांची संबंधित 173 गुन्हेगारांना अटक केली असून 11,000 कामगारांना हद्दपार केले आहे.

























































