अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘AAIB’ मार्फत चौकशी होणार; रोहित पवारांच्या मागणीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी या अपघाताची ‘एएआयबी’ (AAIB – Aircraft Accident Investigation Bureau) मार्फत स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती, ज्याची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे काही घातपात होता, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, ‘एएआयबी’ ही एक स्वतंत्र चौकशी संस्था आहे, जी थेट केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येत नाही. या संस्थेला जागतिक स्तरावरील कोणत्याही तपास यंत्रणेची मदत घेण्याचे अधिकार आहेत.