
एअर इंडियाने एका एअरबस विमानाचे आवश्यक असलेले एअरवर्थीनेस रिव्यू सर्टिफिकेट (एआरसी) नसताना आठ वेळा उड्डाण केले. याप्रकरणी नागरी उड्डाण नियामक संचालनालयाने एअर इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड केला आहे.
या विमानाद्वारे 24 आणि 25 नोव्हेंबरदरम्यान नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या दरम्यान प्रवासी वाहतूक करण्यात आली होती. संबंधित एअरबस विमानाचे एआरसी प्रमाणपत्र नव्हते. 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने स्वतः याबाबत डीजीसीएला याबाबत माहिती दिली होती.



























































