साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 15 फेब्रुवारी 2026 ते शनिवार 21 फेब्रुवारी 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष  – कर्जाचे काम करा

चंद्र, बुध युती, च्रं गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या पूर्वार्धात महत्वाची भेट, चर्चा करा. नोकरीत वरिष्ठांना मदत करा. धंद्यात वाढ होईल. सन्मान मिळेल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दि. 15, 18

वृषभ – आत्मविश्वास वाढेल

चंद्र, बुध युती, बुध गुरू त्रिकोणयोग. आत्मविश्वास, उत्साह वाढवणारी घटना घडेल. मेहनत घ्या. समस्या सोडवा. नविन परिचय प्रेरणादायी ठरेल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लाभ होईल. प्रतिष्ठा वाठेल. शुभ दि. 18, 19

मिथुन – प्रवासात सावध रहा

चंद्र, शुक्र युती, बुध शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला वाद, तणाव होईल. चातुर्य वापरा. वैर वाढवू नका. प्रवासात सावध रहा. नोकरीधंद्यात गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्याल. शुभ दि. 18, 19

कर्क – रागावर नियंत्रण ठेवा

शनि, नेपच्यून युती. चंद्र, मंगळ युती. भावनेच्या आहारी न जाता वागा. रागाच्या भरात चुकीचे भाष्य टाळा. मित्रपरिवारातील गैरसमज टाळा. व्यवहारात फसगत होऊ देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी येतील. शुभ दि. 20, 21

सिंह – संयमाने वागा

चंद्र, शुक्र युती, चंद्र गुरू त्रिकोणयोग. गुप्त कारवायांना कमी न लेखता संयमाने वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. नोकरीत यश मिळेल. योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने अडचणींवर मात कराल. शुभ दि. 18, 19

कन्या – निर्णयात सावध रहा

चंद्र, शनि युती, चंद्र गुरू त्रिकोणयोग. भलत्या व्यक्तीच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. फसगत, धोका होण्याची शक्यता. नोकरीत चूक नको. कायद्याच्या चौकटीत राहून भाष्य करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 15, 20

तूळ – नोकरीत सतर्क रहा

बुध, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र युती. अडचणींवर मात करून यश मिळवायचे आहे. राग वाढवणाऱ्या घटना घडतील मात्र संयम बाळगा. नोकरीत सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज होईल. वरिष्ठांना खूष करा. शुभ दि. 18, 19

वृश्चिक – फसगत टाळा

शनि, नेपच्यून युती, चंद्र, मंगळ लाभयोग. यश सहज मिळेल या भ्रमात राहू नका. दूरदृष्टिकोन बाळगा. कोणताही समस्या उग्र रूप धारण करू शकते. मैत्री जपा. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेळकाढू धोरण ठेवा. शुभ दि. 20, 21

धनु  – कामे मार्गी लावा

चंद्र, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. मोठे ध्येय गाठा. नोकरीधंद्यात प्रगतीची संधी मिळेल. कर्जाचे काम करा. नविन परिचय उत्साहवर्धक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण कामे मार्गी लावा. शुभ दि. 15, 18

मकर – सौम्य धोरण ठेवा

चंद्र, बुध युती, चंद्र मंगळ लाभयोग. गुप्त कारवाया समजल्या तरी चातुर्याने उपाय शोधा. प्रत्येक वेळी आक्रमक भूमिका घेणे योग्य ठरणार नाही. सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकार्य, प्रतिष्ठा लाभेल. सावधगिरी बाळगा. शुभ दि.  18, 19

कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या

शनि, नेपच्यून युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला वाद, वैर वाढवू नका. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. तुमच्या क्षेत्रातील कामे मार्गी लावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल.  शुभ दि. 19, 20

मीन – अतिशयोक्ती नको

चंद्र, मंगळ युती, चंद्र, प्लुटो लाभयोग. जिद्दीने महत्त्वाची कामे पूर्ण करा. कुठेही अतिशयोक्ती नको. भावनेच्या आहारी जाऊ नका. मोह, व्यसन टाळा. व्यवहार तपासून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या.  शुभ दि. 15, 21