
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकाेंडा यांनी ‘नेटफ्लिक्स’ने देऊ केलेली 60 कोटी रुपयांची ऑफर नाकारल्याची चर्चा आहे. नेटफ्लिक्सला या दोघांच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह स्ट्रीमिंग हक्क हवे होते, परंतु रश्मिका-विजयने नेटफ्लिक्सची ही ऑफर नम्रपणे नाकारली आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकाsंडा या दोघांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबाद येथील विजयच्या घरी जवळचे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याची चर्चा आहे. आता सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्यानुसार, हे दोघे येत्या 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नासंबंधी दोघांकडूनही अद्याप अधिपृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु या दोघांचे लग्न फेब्रुवारीत होणार असून लग्नाच्या एक्सक्लुसिव्ह स्ट्रीमिंग हक्कासाठी नेटफ्लिक्सने 60 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शवली होती. जर या दोघांनी हा प्रस्ताव स्वीकारला असता तर नेटफ्लिक्सने ओटीटीवर या लग्न सोहळ्याचे व्हिडीओ दाखवले असते. विजय आणि रश्मिका कोणत्याही किमतीत त्यांच्या कथित लग्नाचा व्हिडीओ विपू इच्छित नाहीत. त्यांना लग्नाचा संपूर्ण समारंभ खासगी ठेवायचा आहे. 60 कोटींच्या ऑफरला नकार देऊन या दोघांनी खासगी आयुष्याला प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, ओटीटीवर सेलिब्रिटींच्या लग्नाचा ट्रेंड हा जुनाच आहे. याआधी अभिनेत्री नयनतारा आणि चित्रपट निर्माता विग्नेश सिवान यांनी 9 जून 2020 रोजी चेन्नईत लग्न केले होते. या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह स्ट्रीमिंग हक्क 25 कोटींना विकले होते.


























































