हिंदुस्थानात 4 हजार कोटींहून अधिक स्पॅम काॅल्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2025 मध्ये देशातील नागरिकांना 4,000 कोटींहून अधिक स्पॅम काॅल्सचा सामना करावा लागला. ज्यामुळे वाढते फसवणूक प्रकार, त्रासदायक काॅल्स आणि डिजिटल जोखमीचे गांभीर्य अधोरेखित होते. टकाॅलरच्या नव्या अहवालानुसार, यापैकी 1,189 कोटी अनावश्यक काॅल्स वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ब्लॉक करण्यात आले. त्यामुळे लाखो लोकांची फसवणूक टळली. 2025 मध्ये टकाॅलरने हिंदुस्थानात 4,168 कोटींहून अधिक स्पॅम काॅल्सची ओळख पटवली, त्यापैकी 1,189 कोटी काॅल्स वापरकर्त्यांनी ब्लॉक केले.