हिंदुस्थानी पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सुधारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सने 2026 मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली असून या यादीत हिंदुस्थानला 75 वे स्थान मिळाले आहे. याआधी हिंदुस्थान 80 व्या स्थानावर होते. याचाच अर्थ हिंदुस्थानच्या रँकिंगमध्ये 5 स्थानांची सुधारणा झाली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगातील 200 देशांच्या पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. हिंदुस्थानच्या पासपोर्ट रँकिंगमध्ये सुधारणा झाल्याने आता जगातील 56 देशांमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना व्हिसा-फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळेल. या यादीत पाकिस्तान पासपोर्ट 97 व्या क्रमांकावर आहे.