
1 तुमचा स्मार्टफोन हा कायम हॅकर्सच्या निशाण्यावर असतो. खबरदारी घेऊनदेखील स्मार्टफोन हॅक झाल्यास काही गोष्टींची काळजी घेऊन पुढील नुकसान टाळता येते.
2 स्मार्टफोन हॅक झाल्यास सर्वप्रथम फोन फ्लाईट मोडवर टाका, जेणेकरून हॅकर्स तुमचा डेटा ट्रान्सफर करणार नाही.
3 एखाद्या दुसऱया स्मार्टपह्नचा किंवा पीसीचा वापर करून बँक, सोशल मीडिया तसेच ईमेलचे पासवर्ड बदला. बँकेला तत्काळ कळवून खात्यावरील व्यवहार ब्लॉक करा.
4 फोनमधील अज्ञात अॅप्स लगेच डिलीट करा. फोन अँटीव्हायरसने स्पॅन करा. नंतर फॅक्टरी रिसेट करा. अडचण कायम राहिल्यास कंपनीच्या सेवा केंद्रावर जाऊन मदत घ्या.
5 सिम कार्डवरील काॅल फॉरवार्ंडग तपासून घ्या. सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. यामुळे आर्थिक नुकसानभरपाईसाठी मदत होईल.


























































