
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखालून एकाच वेळी रेल्वेमार्ग आणि रस्ता तयार होणार आहे. बैठकीत देशातील पहिल्या रोड-कम-रेल बोगद्यासह पह्र लेन एक्सेस-पंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली. यासाठी 18,662 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणासाठी 11 हजार कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात घोटी-त्र्यंबक-जव्हार-मनोर-पालघर या ‘राष्ट्रीय महामार्ग 160-अ’च्या कामाला मंजुरी दिली. त्यात पुनर्वसन आणि उन्नतीकरणाचा समावेश आहे. यासाठी 3,320.38 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा एकूण 154.63 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. नाशिक जिह्यात अंबड आणि सातपूर या भागात मोठय़ा प्रमाणात औद्योगीकरण झाल्यामुळे मालवाहतूकदेखील त्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे या टप्प्याचे उन्नतीकरण आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
असा असेल देशातील पहिला अंडरवॉटर रेल्वे–रस्ते बोगदा
ब्रह्मपुत्रा नदीवरील देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच आणि जगातील दुसरा अंडरवॉटर रोड-कम-रेल्वे बोगदा राहणार आहे. इंजिनीअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन मॉडेलच्या धर्तीवर हा ब्रह्मपुत्रा नदीखाली बोगदा बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत गोहपूर ते नुमालीगड यादरम्यान 15.79 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जाईल. नुमालीगड आणि गोहपूर या दोन शहरांमध्ये सुमारे 240 किमी अंतर असून ते कापायला 6 तास लागतात. या प्रकल्पामुळे अतिशय कमी वेळ लागेल. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसह ईशान्येकडील राज्यांना या प्रकल्पामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच सुमारे 80 लाख लोकांना यातून रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.
मंत्रिमंडळाचे इतर प्रमुख निर्णय
n पंतप्रधान कार्यालय नव्याने बांधलेल्या ‘सेवा तीर्थ’मध्ये स्थलांतरित करण्यास मंजुरी.
n एक लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय मदतीसह अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे.
n लहान शहरांसाठी 5 हजार कोटी रुपयांच्या व्रेडिट रिपेमेंट गॅरंटी योजनेलाही मंजुरी
























































