
बांगलादेशचे परराष्ट्र धोरण हे बांगलादेशच्या जनतेच्या हितांवरून ठरेल. परराष्ट्र धोरणात कोणीही ‘मास्टर’ नसेल, आमचे सर्वांशी समान मैत्रीचे संबंध असतील, असे बांगलादेशचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांनी स्पष्ट केले. बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) विजय मिळवला. बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी निवडणुकीत विजयानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी हिंदुस्थानसोबतच्या संबंधांबाबत म्हणाले की, हिंदुस्थान, चीन आणि पाकिस्तान या सर्व देशांशी संबंध ठेवताना बांगलादेशच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊ. शेख हसीना यांचे प्रत्यार्पण हे पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असेल, असे रहमान यांनी स्पष्ट केले. तारिक रहमान यांनी ‘सार्क’ ही संघटना पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली.

























































