Short news – थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची पालिकेकडून नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱया तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱया मोठय़ा थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेकडून कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. विहित मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर मालमत्तेवर कलम 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल. त्यातूनही कर वसूल झाला नाही तर कलम 206 अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल.

पावसाळ्यापूर्वी नेपियन सी रोडचे काँक्रिटीकरण

पालिकेमार्फत, मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्कदरम्यान नेपियन सी रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 770 मीटर लांब व 27.45 मीटर रुंद रस्ता करण्यात येणार आहे. काँक्रिटीकरण कामाच्या कालावधीत तात्पुरते वाहतूक बदल, अंशतः रस्ता बंद तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.