शेवटच्या क्षणापर्यंत मी लढत राहणार – मनोज जरांगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही आरक्षणाकरिता लढलो व बऱयापैकी आरक्षण पदरात टाकून घेतले, म्हणूनच आज आमचा मराठी बांधव, आमच्या लेकरांना बरंच काही मिळालं. आज शरीर साथ देत नसले तरी शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार राहीन. मात्र, तुम्ही सर्वांनी याकरिता साथ द्यावी व वेळ येईल तेव्हा पाठीशी उभे रहावे, अशी साद मनोज जरांगे पाटील यांनी भिगवण येथील मराठा बांधवांना घातली. अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण शाखा व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न दत्तामामांनी लवकर सोडवावा. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजींनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मग हे शासन का कर्जमाफी करू शकत नाही? असा सवाल त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जूनपर्यंत ताटकळत न ठेवता एप्रिलमध्येच मार्गी लावावा, अशी विनंतीही जरांगे यांनी केली.

व्याख्यानमालेसारखे दुसरे कोणतेही प्रबोधन असू शकत नाही. आजच्या तरुणांची विमनस्क मनस्थिती पाहिली तर, अशा प्रकारच्या व्याख्यानमाला होणे गरजेचे आहे आणि त्यात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.