उत्तर प्रदेशमध्ये धावत्या कारवर पेट्रोल पंपचा पोल पडला, सपा नेत्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे पेट्रोल पंपचा 40 क्विंटल वजानाचा पोल एका कारवर कोसळला. या दुर्घटनेत कारचा चक्काचूर झाला असून त्यात बसलेल्या समाजवादी पार्टीच्या नेत्याचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

लाल बहादूर यादव असे त्या नेत्याचे नाव असून ते बाबुगंज येथे एका कामानिमित्त गेले होते. रविवारी संध्याकाळी ते बाबुगंज येथून त्यांच्या क्रेटा गाडीने प्रतापगढ येथे आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. ही दुर्घटना त्यांच्या घरापासून अवघ्या 500 मीटरवर घडली आहे.

भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाच्या जाहिरातीचा हा पोल तब्बल 65 फूट उंच तर 40 क्विटर वजनाचा होता. हा पोल त्या ठिकाणी बसवण्याचे काम सुरू असताना क्रेनच्या पट्ट्यातून तो सुटला व थेट कारवर कोसळला.