
पश्चिम बंगालमधील विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत गंभीर गैरवर्तन, कर्तव्यात कसूर आणि वैधानिक अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सात सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना (AEROs) तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार, लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम १३ सीसी (Section 13CC of the RP Act 1950) अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून या सात अधिकान्यांदर निलंबनाची कारवाई केली आहे, तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना या सर्व अधिकान्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिका-यांनी मतदार यादीच्या छाननी दरम्यान अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रे नसतानाही मंजुरी दिली. मतदारांची पात्रता आणि मॅपिंगमध्ये विसंगती असूनही कोणतीही सुधारात्मक कारवाई न करता अपात्र प्रकरणांना मंजुरी देऊन आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे.
निलंबित अधिका-यांची यादी:
१. सेफौर रहमानः समशेरगंज (मुर्शिदाबाद) कृषी विभाग सहाय्यक संचालक.
२. नितीश दासः फराक्का महसूल अधिकारी.
३. डालिया रॉय चौधरी: मयनागुडी महिला विकास अधिकारी,
४. मुर्शिद आलमः सुती क्लीक सहाय्यक कृषी संचालक (ADA).
५. सत्यजित दासः केनिग पूर्व संयुक्त गटविकास अधिकारी (Joint BDO).
५. जॉयदीप कुंडू: कैनिंग पूर्व मत्स्य मुदत विस्तार अधिकारी (FEO).
७. देवाशिष बिस्वासः देवा संयुक्त गटविकास अधिकारी (Joint BDO).
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, या अधिका-यांविरुद्धची शिस्तभंगविषयक कारवाई संबंधित कॅडर नियंत्रण प्राधिकरणाने कोणत्याही विलंबाशिवाय सुरू कराची आणि त्याबाबतचा अहवाल आयोगाला सादर करावा.
EC Suspends 7 West Bengal AEROs for Misconduct in Voter Revision Process
The Election Commission of India has suspended seven AEROs in West Bengal for dereliction of duty and misuse of powers during the special intensive revision process. Read more about the disciplinary actions taken.
Keywords: Election Commission of India, West Bengal, AERO suspension, Section 13CC RP Act, voter list revision, West Bengal news, election duty misconduct.























































