
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी इयत्तेची परीक्षा उद्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 11 मार्चपर्यंत ही परीक्षा होईल. दहावीचा पहिला पेपर गणिताचा असेल, तर बारावीचा पहिला पेपर बायोटेक्नॉलॉजी आणि शॉर्टहँडचा असेल. परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचावे. पाण्याची बाटली तसेच साधे घडय़ाळ घालण्यास परवानगी असून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.




























































