‘एपस्टीन फाइल्स’मध्ये नाव असूनही बिल गेट्स यांच्याबाबत सरकारची भूमिका मवाळ; काँग्रेसचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि लैंगिक अपराधी जेफ्री एपस्टीन यांच्यातील कथित संबंधांवरून आता हिंदुस्थानच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीबाबत सरकार मवाळ भूमिका का घेत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

पवन खेडा यांनी आरोप केला की, ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये नाव आल्यानंतरही हिंदुस्थान सरकार बिल गेट्स यांच्याबाबत मवाळ भूमिका घेत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांचे स्वागत करत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री अशा व्यक्तींशी संबंधित कार्यक्रमांकडे डोळेझाक करत आहेत.

सूत्रांच्या हवाल्याने खेडा यांनी दावा केला की, सरकारने बिल गेट्स यांना ‘एआय समिट’साठी दिलेले निमंत्रण रद्द (Disinvite) केले होते. मात्र, बिल गेट्स यांनी “मी येणार आणि भाषणही देणार” अशी ठाम भूमिका घेतल्याचे समजते.

“सरकार सांगते की आम्ही एपस्टीनच्या पीडितांच्या सोबत आहोत, मग हे सांगण्यासाठी सूत्रांची गरज काय? पंतप्रधानांनी स्वतः समोर येऊन ही भूमिका स्पष्ट का केली नाही? त्यांना नेमकी कोणाची भीती वाटतेय? बिल गेट्स यांची की एपस्टीनच्या टोळीतील इतरांची?” असा रोखठोक सवाल खेडा यांनी विचारला.