
रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती आणि वनविभागाच्या माध्यमातून २२ व २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे या संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात अधिवास असणाऱ्या पक्ष्यांना वेगळी ओळख मिळणार आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पक्षी संमेलनाची माहिती दिली. २२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता हॉटेल कोहिनूर येथे उपस्थितांची नोंदणी होणार आहे.त्यानंतर ११ वाजता पक्षी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.यावेळी जंगलाचे शेतकरी याविषयावर पक्षीमित्र प्रतिक मोरे यांचे व्याख्यान होणार आहे.
पक्षी अभ्यासक विराज आठल्ये यांचे सागरी आणि स्थलांतरित पक्षी विषयावर व्याख्यान होणार आहे.निकिता शिंदे रत्नागिरीतील पक्षांची विविधता याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दुसऱ्या दिवशी काजरघाटी,देवराई,सडामिऱ्या,ना चणे आणि कांदळवन क्षेत्राला भेट दिली जाणार आहे अशी माहिती मनुज जिंदल यांनी दिली.या पक्षीसंमेलनासाठी विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी विशेष मेहनत घेतली असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.



























































