
नेपाळच्या धाडिंगमध्ये प्रवासी बस नदीत कोसळून 18 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. अपघातग्रस्त बस पोखराहून काठमांडूला जात असताना धाडिंगमधील त्रिशुली नदीत बस कोसळली. अपघातात 26 प्रवासी जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.
बसमध्ये 44 प्रवासी होते. मृतांमध्ये सहा महिला आणि 12 पुरुषांचा समावेश आहे. मृतामध्ये दोन न्यूझीलंडच्या नागरिकांचा समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. सेना, सशस्त्र पोलीस दल, नेपाळ पोलीस आणि स्थानिक रहिवाशांकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींपैकी काही जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना काठमांडू येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
























































