
पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी हिने सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. तेजवानी हिने जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली असून न्यायालयाने आज या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला 3 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्याच प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला तसेच खडक पोलीस ठाण्यातही तिच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.



























































