जलजीवन मिशनसाठी केंद्राकडून राज्याला निधीच मिळाला नाही, 25 हजार नळपाणी योजना अपूर्णावस्थेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलजीवन मिशन योजने अंतर्गत राज्यात एकूण 51 हजार 560 पाणी पुरवठा योजना आहेत. त्यापैकी 25 हजार योजना अपूर्णावस्थेत आहेत. केंद्राकडून निधी न आल्यामुळे अनेक गावे नळपाणी योजना व पाण्यापासून वंचित राहिली असल्याची कबुली राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

राज्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्ण असल्याबद्दल काँग्रेसचे सदस्य नितीन राऊत व अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. जलजीवन मिशनसाठी केंद्र शासनाकडून ऑक्टोबर 2024 पासून निधी उपलब्ध न झाल्यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे.