इडनवर संजूची रनपंचमी, विंडीजच्या दहनाने रंगला हिंदुस्थानचा विजयसोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होळीच्या पूर्वसंध्येला कोलकात्याच्या आकाशात फटाके नव्हते, पण संजू सॅमसनच्या बॅटमधून उडणारे फटके होते. नेहमीच पर्याय असलेल्या संजूनेसॅमसन स्पह्टघडवत इडन गार्डन्सवर रनपंचमी साजरी केली. त्यांच्या 97 धावांच्या विध्वसंक खेळीने विंडीजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणत हिंदुस्थानला जगज्जेतेपद राखण्याच्या ध्येयापासून दोन पावलांवर ठेवले.

संजू सॅमसनचा हा तिसरा वर्ल्ड कप सामना होता. तो हिंदुस्थानसाठी नेहमीच पहिल्या पसंतीचा सलामीवीर नव्हता. विश्वचषकाच्या सुरुवातीला तो पर्याय म्हणूनच संघात आला होता, पण नियतीने त्याला रंगपंचमीचा प्रमुख कलाकार बनवले. विंडीजचा 195 धावांचा डोंगर समोर उभा होता. होळीच्या आधी एवढी मोठी होळी पेटवायची, याची कल्पनाही नव्हती. आव्हान पाहून दिल में होळी जळायला लागली होती. धाकधूक वाढली होती, पण संजूने 50 चेंडूंत नाबाद 97 धावा ठोकत विंडीजच्या स्वप्नांनाच खिळे ठोकले. आजचा विजय फक्त आणि फक्त संजूचा होता. तोच आज हिंदुस्थान विनरमॅन बनला.

विंडीजने 195 धावा उभे केलेले आव्हान 2016 च्या आठवणींना उजाळा देणारे होते, पण यावेळी रंग वेगळे होते. अभिषेक शर्मा आणि ईशान किशनने पुन्हा एकदा माती खाल्ल्यावर हिंदुस्थानच्या डोळ्यावर अंधारी आली होती. चाहतेही भेदरले होते. तेव्हा क्षणभर काळजीची सावली पडली. सूर्या है ना असे सारे बोलू लागले, पण आज सूर्या सॅमसनच्या पाठीशी होता. आज सूर्य नाही तर संजू तळपला. त्याने फटके मारले, पण रंग जपून उधळले. 26 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत त्याने खेळाचा सूर हिंदुस्थानी विजयाच्या दिशेने आळवला.

आज वेस्ट इंडीजकडे ना वेगवान वादळ होते ना रहस्यमय फिरकी. त्यांना फक्त हिंदुस्थानची चूक हवी होती, पण संजूने एकही रंग वाया जाऊ दिला नाही. कमी जोखीम, अचूक फटके, आणि राजेशाही थाट. जणू रंगपंचमीला रंग मिसळताना त्याला आपला तोल जराही ढळू दिला नाही. शेवटचा फटका सीमारेषा ओलांडताच सॅमसन गुडघ्यावर कोसळला. आकाशाकडे पाहिले, छातीवर हात ठेवला. जणू म्हणत होता, हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना आता विजयाचे रंग उधळा. होळी मनमुराद साजरी करा.

त्याआधी टॉस जिंकून हिंदुस्थानने विंडीजला फलंदाजीस आमंत्रित केले होते. डावाच्या सुरुवातीला शाय होप आणि रोस्टन चेस यांनी धावांचा पाया भक्कम केला. दोघांनी 68 धावांची भागीदारी रचत हिंदुस्थानी गोलंदाजांवर सातत्याने दबाव ठेवला. अभिषेक शर्माकडून रोस्टन चेसचा सुटलेला झेल पुढे महागात पडला. तो क्षण सामना वळवणारा ठरू शकला असता; पण संधी हातची गेली आणि विंडीजने धावांचा वेग वाढवला.

मधल्या षटकांत शिमरॉन हेटमायरने आपली ओळख पुन्हा दाखवली. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 27 धावांची त्याची तुफानी खेळी म्हणजे झंझावातच. सीमारेषेबाहेर फटके मारत त्याने प्रेक्षकांना थक्क केले. तथापि, जसप्रीत बुमराने एका षटकातील तीन चेंडूंमध्ये हेटमायर आणि चेस यांना बाद करत सामन्यात नवा रंग भरला. 14 षटकांत 4 बाद 119 अशी अवस्था पाहता विंडीज 175 च्या आसपास थांबेल, अशी आशा निर्माण झाली.

पण क्रिकेटचा नाटय़रस इथेच संपला नाही. रोव्हमन पॉवेल आणि जेसन होल्डर यांनी अखेरच्या षटकांत अक्षरशः फटकेबाजीचा स्पह्ट केला. अवघ्या 35 चेंडूंमध्ये 76 धावांची स्पह्टक भागीदारी करत त्यांनी हिंदुस्थानच्या गोलंदाजांच्या योजनांचा चुराडा केला. चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्यांनी धावफलकाला वेग दिला आणि संघाला 195 पर्यंत नेले.