
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गणिताचे दोन्ही पेपर परीक्षेआधीच एका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाले. या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे यातील एक पेपर तीन दिवस अगोदरच टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आला होता. त्यानुसार टेलिग्राम ग्रुप अॅडमीन आणि त्यातील सदस्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































