सरकारची घोषणा लवकरच मेगा भरती, प्राध्यापकांच्या 5 हजार 500 जागा भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून रखडलेली राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती लवकरच होणार असून राज्यभरात तब्बल 5 हजार 500 प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. यासाठी सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूददेखील केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासांत ही माहिती दिली.

सध्या राज्यात 31,185 मंजूर पदांपैकी 19,267 पदे भरलेली असून 11,918 पदे रिक्त आहेत. यापैकी 5,012 पदे भरण्यास शासनाने परवानगी दिली असून एकूण सुमारे 5,500 पदांसाठी मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन मान्यता देण्यात आली असून अर्थ विभागाकडूनही आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • प्राध्यापकांचे पगार आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरील खर्च हा अनिवार्य असल्याने त्यासाठी निधीची तरतूद केल्याची माहिती पाटील यांनी दिली.